मागील सात ते आठ दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने अनेकांची त्रेधातिरपीट उडविली आहे. अनेकांना निवारा केंद्रात हलविण्यात आले आहे. अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित आहे मात्र प्रत्येकाची गरज असणारा आणि प्रत्येकजण त्याच्यावरच विसंबून असणारा मोबाईल आता नॉट रिचेबल दाखवू लागला आहे.
ही परिस्थिती मागील अनेक दिवसापासून सुरू आहे. त्यामुळे प्रत्येक जणच अनेकांना विचारलाय साहेब रेंज आहे का? आपल्या मोबाइलला मात्र सर्वत्रच आणि सर्वच कंपन्यांचे टावर मुसळधार पावसामुळे बंदच असल्याचे दिसून येत आहे. ही परिस्थिती तालुक्या बरोबरच जिल्ह्याची निर्माण झाली आहे. त्यामुळे रेंज पावर साऱ्यांनाच दिसून आली आहे.
मुसळधार पावसामुळे अनेक कंपन्यांचे टॉवर बंद अवस्थेत आहेत या परिस्थितीला अनेक नाहक त्रास सहन करावा लागला पूरपरिस्थितीत अडकलेल्या माणसांनाही याचा सामना करावा लागला आहे. रेंज नसल्यामुळे अनेकांना संपर्क साधणे कठीण झाले आहे. अशी अवस्था असली तरी काही अडचणीत असणाऱ्या माणसांकडे मोबाईल मागितल्यास सुरुवातीलाच साहेब रेंज आहे का? तुमच्या मोबाईलला हा प्रश्न सर्रास पडत आहे. हा प्रश्न सर्रास पडत असला तरी अनेकांच्या मोबाईलवर रेंज नसल्यामुळे काहीजण चांगलेच अडचणीत आल्याचे प्रकार सामोरे आले आहेत.
कोणत्याही सिम कार्डला नेटवर्क नसल्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अनेक जण पूरपरिस्थितीत अडकलेल्या नाही रेंज नसल्यामुळे त्यांना मदत त्यांना संपर्क साधणे कठीण झाले आहे. ही परिस्थिती उद्भवलेली असतानाच अनेकांनी तक्रारही केली आहे. मात्र पावसामुळे आम्ही काही करू शकत नाही असे संबंधित कंपन्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे कधी एकदा मोबाईलला रेंज आणि नेटवर्क सुरळीत होणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. तातडीने ही समस्या सोडवावी अशी मागणी जोर धरू लागली आहे..