सरदार्स सरकारी हायस्कुल व कॉलेजच्या आवारात आज बेळगाव शहराचे आमदार अनिल बेनके आले. त्यांनी स्वतः आवारातील अस्वच्छता दूर केलीच शिवाय शाळा, एन एस एस चे विद्यार्थी आणि भाजप कार्यकर्त्यांवर सातत्याने स्वच्छता करण्याची जबाबदारीही सोपवली.
सरदार्स आवारात पसरलेली घाण विद्यार्थ्यांसाठी धोक्याची होती. याकडे नागरिकांनी आमदार अनिल बेनके यांचे लक्ष वेधले होते. स्वतः आमदार आले आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात केल्यामुळे बाकीचेही स्वच्छतेसाठी पुढे आले आणि लवकरच शाळेचे आवार चकाचक होईल यात शंका नाही.
ही एकच शाळा नाही तर सर्व सरकारी आणि खासगी शाळांचे परिसर स्वच्छ ठेवा अशी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली आहे. समस्या आल्यास मला संपर्क करा मी मदतीला आहे पण शाळा परिसर घाण ठेऊ नका असेही आमदारांनी यावेळी सांगितले.