भातकांडे इंग्लिश मिडीयम स्कुलच्या विद्यार्थ्यांना मिशन मंगल हा चित्रपट दाखविण्यात आला.तीनशे विद्यार्थ्यांनी हा चित्रपट पाहिला.
विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग दोघांनी मिळून चित्रपट पाहण्याचा आनंद घेतला.विद्यार्थ्यांना अवकाश मोहिमेविषयी माहिती व्हावी त्यांचे सामान्यज्ञान वाढावे या उद्देशाने चित्रपट विद्यार्थ्यांना दाखवण्यात आला.भारताने अवकाश क्षेत्रात केलेली प्रगती आणि मोहिमेसाठी घ्यावे लागणारे परिश्रम यांची माहिती विद्यार्थ्यांना चित्रपटातून मिळाली.
मोहिमेत अडथळे कसे येतात ,त्यावर मात कशी केली जाते याचें दर्शन चित्रपटातून घडल्यामुळे विद्यार्थ्यांत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होण्यास मदत होते.अडथळे आले ,अपयश आले तरी खचून न जाता जिद्दीने पुढे जायचे असा संदेश विद्यार्थ्यांना चित्रपटातून मिळाला असे शाळेच्या मुख्याध्यापिका दया शहापुरकर यांनी सांगितले.