नूतन मंत्री शशिकला जोल्ले यांनी अथणी तालुक्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा करून त्यांना केल्या जात असणाऱ्या मदतीची आणि पुनर्वसनाची पाहणी केली .त्यावेळी निवारा केंद्रात आश्रय घेतलेल्या पूरग्रस्त जनतेने गेल्या दोन दिवसांपासून जेवण दिले जात नसून त्याऐवजी भडंग दिले जात असल्याची तक्रार केली.
यावर मंत्री शशिकला जोल्ले यांनी चिकोडी उपविभागीय अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.पूरग्रस्तांना जेवण देण्याऐवजी भडंग दिले जात असल्याबद्दल संताप व्यक्त करून तुम्ही मदत कार्य काय करता?सरकारने पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी त्यांची व्यवस्था करण्यासाठी निधी दिला आहे.
सर्व ती मदत पूरग्रस्तांना मदत करा असे आदेश दिले असताना काय काम तुम्ही करता?तुमच्या हाताखाली नोडल अधिकारी,पिडीओ ,तलाठी आणि अन्य अधिकारी आहेत.तुम्ही सगळे काय करता?सायंकाळ पर्यंत सगळी व्यवस्था करून मला रिपोर्ट दिला पाहिजे.जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा विषय मी मांडून तक्रार करणार असल्याचे देखील जोल्ले यांनी सांगितले.