मंत्रिपदासाठी माझे नाव सुचविण्यात आले असा फोन मंगळवारी रात्री दोन वाजता मला आला. मी तातडीने शपथ घेण्यासाठी बेंगलोर ला गेलो. मी आमदार नाही किंवा विधानपरिषद सदस्य नाही .पण मंत्रिपदासाठी माझे नाव कोणत्या नेत्याने सुचवले हे सुद्धा मला माहित नाही. अशी प्रतिक्रिया दिली आहे कर्नाटक सरकारच्या मंत्रीपदाची शपथ घेतलेले लक्ष्मण सवदि यांनी.
या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. यामुळे सध्या तरी राजकारणात असले तरी पदापासून ते दूर होते. मात्र अचानक मंत्रिपदावर त्यांचे नाव सुचविण्यात आले. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. उमेश कत्ती आणि भालचंद्र जारकीहोळी असंतुष्ट आहेत. त्याचबरोबर कर्नाटक राज्यात इतर ठिकाणी असंतोषाची परिस्थिती आहे .अशावेळी मंत्री पद स्वीकारून पहिल्यांदाच बेळगावच्या सांबरा विमानतळावर आले असता लक्ष्मण सवदीयांनी पत्रकारांशी संवाद साधला. मंत्री सवदी यांचे मान तळावर स्वागत करण्यासाठी कुणीही स्थानिक लीडर आले नव्हते.
आपल्याला पद मिळेल अशी अपेक्षा नव्हती मात्र पक्षाशी दाखवलेला प्रामाणिकपणा व निष्ठा पाहून पक्षाने हा निर्णय घेतला असावा ,असे मला वाटत आहे .आपण स्वतः काही या मंत्रिपदासाठी प्रयत्न केला नव्हता. मात्र कोणी आपले नाव सुचवले हे सांगणे आपल्यालाच कठीण जात आहे. मला त्याची माहिती नाही. असे त्यांनी सांगितले .नव्याने मंत्री झालेल्या निपाणिच्या शशिकला जोल्ले त्यांच्यासोबतच विमानतळावर उतरल्या.