नव्यानेच मंत्री पदावर विराजमान झालेल्या लक्ष्मण सवदी यांनी रात्री उशिरा बेळगावमध्ये दाखल होऊन जिल्हा पंचायत सभागृहात बैठक घेतली.
जिल्हाधिकारी जिल्हा पंचायतीच्या अध्यक्ष खासदार ,निपाणीच्या आमदार आणि मंत्री झालेल्या शशिकला जोल्ले यांच्याबरोबर बैठक घेऊन त्यांनी जिल्ह्याच्या विकासाचा आणि पूर परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
त्यांच्या मंत्रीपदावरून संशय व्यक्त केला जात आहे .आमदार पदावर नसतानाही मंत्रीपद दिले यावरून वाद होत आहे अशा लक्ष्मण सवदी यांनी ही बैठक घेऊन त्यांना विरोध करणार्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे .
मंत्री पद मिळवण्यासाठी आमदार पद महत्त्वाचे नाही. काम करण्याची तयारी हवी आहे हेच त्यांनी दाखवून दिले आहे.