मराठा को ऑपरेटिव्ह क्रेडिट बँकेला दोन कोटी 45 लाख रु.नफा झाला असून बँकेच्या ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी संचालक वर्ग आणि कर्मचारी कटिबद्ध आहेत अशी माहिती बँकेचे चेअरमन लक्ष्मणराव होनगेकर यांनी बँकेत बोलावलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
बँकेने सत्त्यहत्तर वर्षे पूर्ण केली असून सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्यही बँक करत आहे.पुराग्रस्तासाठी एक्कावन्न हजार रु. निधी बँकेने दिला आहे.कर्मचाऱ्यांना देखील सर्व सुविधा नियमाप्रमाणे पुरविण्यात येत आहे.बँकेच्या एकूण सहा शाखा आहेत.बँकेत कोणालाही झिरो बॅलन्स खाते उघडून एटीएम कार्ड घेता येते.भविष्यात ग्रामीण भागात बँकेच्या शाखा उघडण्याची योजना आहे.
बँकेच्या एकूण ठेवी 125 कोटी 85 लाख इतक्या आहेत.ज्येष्ठ नागरिकांना अर्धा टक्का व्याज अधिक देण्यात येते.बँकेत आर टी जी एस आणि नेफ्ट साठी ग्राहकाकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही.अत्याधुनिक तंत्रज्ञान बँक व्यवहारासाठी वापरले जात आहे.साठ वर्षे पूर्ण झालेल्या आणि सभासद होऊन पंचवीस वर्षे पूर्ण झालेल्या सभासदाना एक हजार रु सहकार्य निधी देण्यात येतो.सभासदांच्या गुणवंत मुलांना दरवर्षी पारितोषिके देण्यात येतात अशीही माहिती होनगेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला व्हॉइस चेअरमन दिगंबर पवार,संचालक बाळासाहेब काकतकर,बाळाराम पाटील,अशोक भोसले,विश्वनाथ हंडे, विनोद हांगीरकर,एन .वाय. पाटील,जनरल मॅनेजर विश्वास धुराजी आणि अन्या संचालक उपस्थित होते.