बेळगाव जिल्ह्यातील पुरपरिस्थितीने थैमान घातले आहे. प्रशासनाने बोटी मागवून पाण्यात अडकलेल्या नागरिकांचा बचाव करण्याचे काम सुरू केले आहे.
इंगळी, मांजरी, अथणी व येडुर याठिकाणी एस डी आर एफ चे 45 जण तैनात करण्यात आले आहेत.भारतीय लष्कराचे 90 जवान आणि अग्निशामक दलाचे 75 जण तैनात करण्यात आले असून ते डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये प्रशिक्षित आहेत.
पोलीस दलालाही आवश्यक ठिकाणी दक्ष ठेवण्यात आले असून एकूण 8 ठिकाणी गंजी केंद्रे उभारण्यात आली आहेत.
एकूण 30 बोटी सेवेत आहेत.पूरग्रस्त भागातील कुटुंबांना स्थलांतरित करण्याचे काम एसडीआरएफ करीत असून एन डी आर एफ टीम अजून आलेली नाही. पुराचा धोका होत असलेल्या गावांना इतरत्र हलवण्याचे काम वार फुटेज वर सुरू आहे.
काल कोयना नदीतून अतिरिक्त पाणी सोडल्याने कृष्णा नदीच्या पूर येत आहे यासाठी बेळगाव जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.डी सी एस पी यांनी कालच पहाणी केली होती.