मागील आठ दिवसात पडलेल्या पावसाने नागरिकांना हैराण करून सोडले. 4 ऑगस्ट पासून 11 ऑगस्ट पर्यंत झालेला पाऊस सगळीकडे पूर निर्माण होण्यास कारणीभूत ठरला .या पावसाने नदी-नाले आणि तलावांना महापूर आणला. घराघरात पाणी शिरले.
आठ दिवसांमध्ये बेळगाव जिल्ह्यात खानापूर तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला असल्याची नोंद मिळाली आहे. 1316.1 मिलिमीटर इतका पाऊस या आठ दिवसांमध्ये खानापूर तालुक्यात झाला आहे. जिल्हा पर्जन्यमान खात्याने संपूर्ण जिल्ह्यातील वेगवेळ्या ठिकाणी गेल्या आठ दिवसात झालेल्या पावसाची नोंद मिळाली आहे.
आज पावसाने उघडीप दिली तरी मागील आठ दिवस अति खडतर होते. याकाळात सगळीकडेच संततधार सुरू होती. खालून पाणी वाढताना वरूनही पाणी जास्त होते. नागरिक हतबल होऊन जा रे जा रे पावसा चा धावा करत आहेेेत
उपलब्ध नोंदीनुसार खानापूर नंतर बेळगाव मध्ये सर्वाधिक पाऊस झाला आहे. तर सर्वात कमी पाऊस रामदुर्ग तालुक्यात झाला आहे. अथणी येथे 83.8, बैलहोंगल मध्ये 346.8, बेळगाव मध्ये 945.5, चिकोडी येथे 310.5, गोकाक मध्ये 180.5, हुक्केरी मध्ये 326.0, रायबाग मध्ये 175.0, रामदुर्ग येथे 79.5 व सौंदत्ती येथे 198.5 मीमी पाऊस झाला आहे.