सीमा भागातील कुस्तीचे मोठे असलेल्या येळ्ळूर च्या महाराष्ट्र मैदानातील फुटूक तलाव फुटला आहे.सतत होत असलेल्या मुसळधार पावसाने रविवारी पहाटे हा तलाव फुटला असून शेकडो एकर सुपीक जमीन पाण्याखाली गेली आहे. यामुळे येळ्ळूर मधील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
गेल्या दोन दिवसापूर्वी तब्बल 40 वर्षांनी हा तलाव इतक्या मोठ्या प्रमाणात भरला होता पाणी ओव्हरफ्लो झाले होते ग्राम पंचायत सदस्यांनी भेट देऊन अतिरिक्त पाणी नाल्या द्वारे बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता मात्र राजहंस गड परिसरतील सर्व पाणी याच तलावात भरत असल्याने पाण्याचा प्रवाह वाढून तलाव फुटला आहे. फुटलेला तलाव पहाण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली आहे
बेळळारी नाल्याला जसा पूर आलाय त्याच पद्धतीने फुटूक तलावा शेजारील सुपीक जमीनीला देखील पूर आला असून भात पीक पाण्याखाली गेलं आहे.शासनाने पिकाची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी येळ्ळूर ग्राम पंचायत सदस्य राजू पावले यांनी केली आहे.
येळ्ळूर येथील बासमती तांदळाला बाजारात मागणी असते हेच भात पीक असलेले शेकडो एकर जमीन पाण्याखाली गेली आहे या अगोदर बळळारी नाला आणि हलगा मच्छे बायपास मुळे भात शेतीला पूर आला असून तलाव फुटून देखील बळी राजाचे नुकसान झाले आहे.स्थानिक लोक प्रतिनिधीनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी देखील केली जात आहे.