पावसाचे पाणी वाढत आहे. गोकाक आणि चिकोडी भागात घरा घरात पाणी आहे. या पाण्याने एक स्वामीजींच्या मठाला वेढा घातला होता. स्वामीजी एकटे नव्हते तर जोडीला त्यांचे 10 ते 12 भक्तगणही होते.
बोटीने मदत करणारे पथक आले पण बाकीचे सुरक्षित स्थळी जाऊन पोहोचेपर्यंत स्वामीजी जागचे हलले नाहीत. धर्माच्या शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या या स्वामींनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपला माणुसकीचा धर्म पाळला आहे.
कुंदरगी आडवी सिद्धेश्वर मठ ( ता. गोकाक) येथे घडलेली ही आजची ताजी घटना आहे. यामठात पाणी शिरत असल्याचे लक्षात येताच बोटी घेऊन पथके दाखल झाली. सर्वप्रथम त्यांनी स्वामींना बोटीतून बाहेर येण्यास आणि सुरक्षित स्थळी जाण्यास सांगितले. पण स्वामींनी आपण पहिला येणार नाही. पहिल्यांदा माझ्या भक्तांना वाचवा, त्यांना योग्य ठिकाणी न्या, मग मी येतो, माझी काळजी करू नका, माझे काही बरे वाईट झाले तरी काय फरक पडणार नाही. मी सन्यासी आहे. माझे भक्त सुरक्षित ठिकाणी जाणे महत्वाचे आहे कारण त्यांचे घरचे त्यांची वाट बघत आहेत, त्यांना पहिल्यांदा वाचवा. असे उद्गार काढले.
स्वामींचे हे उद्गार पाहून बचाव कार्यात गुंतलेल्यांनीही आश्चर्य व्यक्त केले. स्वामी ऐकेनात हे लक्षात येताच त्यांनी प्रथम बाकीच्यांना बाहेर काढले वशेवटी राहिलेल्या स्वामींना नेण्यासाठी बोट आणून त्यांनाही सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले.आज कर्नाटकात अनेक स्वामीजी याच प्रकारे काम करत आहेत. या स्वार्थी जगात पहिला मला पाहिजे म्हणणाऱ्या काळात या स्वामीजींचा आदर्श घेण्यासारखा आहे.