*खानापूर तालुक्यात धुवाधार अतिवृष्टी* गावांचा तुटला संपर्क पुलं देखील पाण्याखाली* हेमाडगा राज्य महामार्गावरील हालात्रीचा पूल पाण्याखाली गेल्याने 40 गावांचा संपर्क तुटला* हतरगुंजी, मळव, हब्बनहट्टी पूलही पाण्याखाली* आताही संततधार कायम सुरूच
खानापूर तालुक्यात पावसाने थैमान घातले असून अनेक नदी-नाल्यांच्या पाणीपातळीने धोक्याची रेषा ओलांडली असल्याने प्रशासनाने खबरदारी उपाय हाती घेतले आहेत. सिंदनूर हेमाडगा राज्य महामार्गावरील हालात्रीचा पूल मागील 20 तासापासून पाण्याखाली गेला असल्याने आज सकाळपासूनच बॅरिकेट्स लावून या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
(फोटो : मलप्रभेच्या पाणी पातळीत झालेली वाढ.??)
धोकादायक ठिकाणी पोलिस व गृहरक्षक दलाच्या जवानांचा बंदोबस्त ठेवण्यात आला असून पोलीस अधिकारी व महसूल विभागाचे अधिकारी विविध ठिकाणच्या पूल परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. सध्याही खानापुरात पावसाचा जोर कायम असल्याने हत्तरगुंजी, मळव, हब्बनहट्टी येथील पुलांवर तीन ते चार फूट पाणी आले आहे त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
(फ़ोटो:खानापूर डुक्करवाडी मुडेवाडी मार्गावरील पूलही पाण्याखाली गेला आहे.??)
दिवसभर पावसाचा जोर काय होता मात्र पुलांवर एक ते दीड फूट इतके पाणी आल्याने नागरिक पूल ओलांडून शिवार व शहराच्या दिशेने कामासाठी केले होते. दुपारी तीन नंतर पावसाच्या धुवाधार सरी कोसळण्यास सुरुवात झाल्याने अचानक पाणीपातळीत वाढ होऊन सायंकाळनंतर अनेक पुलांवर पाच ते सहा फूट इतके पाणी चढले होते.
(फ़ोटो:सायंकाळी सहा वाजता हालात्रीच्या पुलावर पाच फूट पाणी आले होते.??)
मुळे खानापूरहून परत जाणाऱ्या नीलावडे, आंबोळी, बांदेकर वाडा, मुगवडे कबनाळी येथील नागरिकांना मळव या ठिकाणीच अडकून राहावे लागले. डुक्करवाडी, मुडेवाडी, हतरगुंजी येथील नागरिकांनाही पारिश्वाड क्रॉस जवळील पूल पाण्याखाली गेल्याने गणेबैल मार्गे प्रवास करावा लागला.