बेळगावच्या कॉलेज रोडवर नेहमी गजबजलेल्या असलेल्या मार्गावर जुन्या न्यू ग्रँड हॉटेल समोर एक धोकादायक वीज खांब हजारो लोकांचा जीव धोक्यात घालत आहे.या खांबाची तातडीने बदली करून त्याठिकाणी दुसरा खांब बसवण्याची गरज आहे. खांबा पडला तर हजारो लोक एकावेळी मरण्याची शक्यता आहे. त्यामध्ये धोकादायक आणि अलगद रस्त्यावर उभा असून कधीही पडू शकतो.
आसपास शाळा आहेत या शाळांमध्ये जाणाऱ्या मुलांना धोका आहे. तसेच या रस्त्यावरून वाहनांची संख्या जास्त असते. त्या वाहनांवर खांब पडला तर जीव जाण्याची शक्यता जास्त आहे. हे वेळीच लक्ष देऊन बदलला हवा होता पण अजून बदलण्यात आलेला नाही याकडे हेस्कोम ने लवकरात लवकर लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
दोन दिवसांपूर्वी खानापूर जवळील रुमेवाडी शेतीत गहाळ झालेली विद्युत भारित तार शेतात भांगलन करणाऱ्या पडल्याने निष्पाप महिलेचा बळी गेला होता हेस्कॉम अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित पणा मुळे अश्या घटना घडत असून बेळगाव शहरात देखील अनेक खांब धोकादायक बनले आहेत त्यांची दुरुस्ती करण्याची तात्काळ गरज बनली आहे.
आम्ही दररोज मुलांना महिला विद्यालयात शाळेला सोडायला आणि आणायला येत असतो या हाय टेन्शन वायरेच्या विद्युत खांबा कडे पाहिल्यास या ठिकाणी जाण्यास भीती वाटत आहे.आगामी चार दिवसात खांब न बदललयास त्याच ठिकाणी हेस्कॉम विरोधात धरणे आंदोलन करू असा इशारा वकील मारुती कामानाचे यांनी दिला आहे.