जल है तो कल है असे म्हणतात.या उक्तीचा खराखुरा अर्थ बापट गल्लीतील जनतेला समजला आहे.या गल्लीतील विहिरीचे आज पूजन करण्यात आले.ही विहीर दमदार पावसामुळे तुडुंब भरली आहे.गल्लीतील नागरिकांनी एकत्र जमून विहिरीचे गंगापूजन केले.विशेष म्हणजे गल्लीतील बहुसंख्य नागरिक आपल्या घरचे कार्य आहे असे समजून उपस्थित होते.ही विहीर म्हणजे बापट गल्लीतील नागरिक आणि व्यावसायिकांना जीवनदायी ठरली आहे.
कडाक्याच्या उन्हात म्हणजे एप्रिल,मे महिन्यात शहरातील विहिरींनी तळ गाठलेला असताना या विहिरीला मुबलक पाणी होते.गल्लीतील नागरिक सगळे मिळून विहिरींची स्वच्छता राखतात. बापट गल्लीतील नागरिक व व्यावसायिक याना व्यवस्थित पाणी मिळावं यासाठी गल्लीतील प्रत्येक कार्यकर्ते आपली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडत असतात .बेळगाव शहरात पाण्याची कमतरता होती म्हणजे 12 दिवसातून एकदा पाणी पुरवठा होत असताना आपल्या गल्लीत दररोज सकाळी 6 ते 10 आणि रात्री 8 ते 10 असा पाणी पुरवठा गल्लीतील नागरिकांसाठी होत होता.
यासाठी कार्यकर्ते कार्यरत असत आजूबाजूच्या गल्लीतील लोक सुद्धा या पाण्याचा उपयोग करीत असत याच संपूर्ण श्रेय निसर्ग व गल्लीतील कार्यकर्त्याना जाते कारण विहिरींची वेळोवेळी स्वच्छता, औषध, इले.मोटार दुरुस्ती, वेळेप्रमाणे पाणी पुरवठा करणे , पाण्याची नाशाडी होणार नाही याकडे लक्ष देणे हे सर्व काही कार्यकर्ते जबाबदारीने पार पाडत म्हणूनच आम्हा गल्लीतील नागरिकांना एप्रिल मे मध्ये पाण्यासाठी जास्त त्रास करून घेण्याची वेळ आली नाही.श्री कालिकादेवी मंडळाचे या कामी मोलाचे सहकार्य लाभले आहे.