गुरुवारी पावसाचा जोर कमी होता मात्र खानापूर भागात अनेक घरांची पडझड सुरू झाली आहे.पुराच्या वेढ्यात अडकलेल्या दुर्गानगर भागातील अनेक घरे कोसळली आहेत.
प्रशासनाच्या वतीने अनेक कुटुंबांना समुदाय भवनात राहण्याची सोय करण्यात आली आहे. पोलीस तहसीलदार प्रशासनाच्या वतीने संपुर्ण दुर्गानगर परीसर खाली करण्यासाठी आहवान करण्यात आले आहे. ध्वनिक्षेपकिवरून आहवान करून दुर्गानगर परीसर खाली करण्यात आले आहे.
खानापूर समितीचे नेते यशवंत बिरजे यांच्या सह आजू बाजूची पाच घरे कोसळली आहेत.मराठी मुलाची शाळा खानापूर येथे पुरग्रस्तांना राहण्याची जेवणाची सोय केली आहे. 8277224321विवेक गिरी संपर्क साधावा ही विनंती करण्यात आली आहे.