विद्युतभारीत तारेचा स्पर्श होऊन मालकीण तळमळत असलेली पाहून विजेची तार तोंडात धरून ओढण्याचा प्रयत्न करणारा कुत्रा आणि मालकीण या दोघांचाही दुर्दैवी अंत झालाआहे खानापूर रेल्वे स्टेशनजवळील आपल्या शेतात रुमेवाडी गावच्या शिवारात ही दुर्दैवी घटना घडली आहे.
शांता मारुती घाडी वय 50 रा. रुमेवाडी असे या घटनेत मयत झालेल्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. मंगळवारी सकाळी शांता या भांगलण करण्यासाठी आपल्या शेतीत गेल्या आल्या होत्या. रात्री त्या घरीं परतल्याने त्यांच्या दोन्ही मुलांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला असता रात्री आठच्या सुमारास शेतवाडीत कुत्रा आणि मालकीण दोघेही मृतावस्थेत आढळले.
शेतात शांता या भांगलन काम करताना विद्युत भरीत तार तुटून खाली पडल्याने त्यांचा स्पर्श पडलेल्या विद्युतभरीत तारेला झाला आणि त्या धडपडू लागल्या.यावेळी मालकिणीची अवस्था बघून कुत्रा मदतीला धावला. त्याने तोंडात विद्युतभारीत तार धरून ती तार मालकिणीपासून दूर नेण्याचा प्रयत्न केला पण कुत्र्यालाही विजेचा धक्का बसला आणि मालकिणीचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या कुत्र्याला प्राण गमवावे लागले.कुत्र्याच्या या स्वामिनिष्ठेबद्दल करावे तेव्हढे कौतुक थोडेच म्हणावे लागेल.
बुधवारी सकाळी खानापूर पोलीस निरीक्षक तहसीलदार आदी अधिकाऱ्यांनी घटनेची पहाणी करून पंचनामा केला. रुमेवाडी येथील शेतकऱ्यांनी कित्येक वेळा शेतात विद्युतभारीत तारा गहाळ झाल्याची तक्रार हेस्कॉमकडे केली होती पण हेस्कॉमने दुर्लक्ष केल्यामुळे एका महिलेला आणि स्वामिनिष्ठ कुत्र्याला आपले प्राण गमवावे लागले.
या घटनेस सर्वस्वी हेस्कॉमचे अधिकारी जबाबदार आहेत त्यामुळेच शेतात काम करणाऱ्या निष्पाप महिलेस आणि जीवाची पराकाष्ठा करून आपल्या मालकिणीला वाचवायचा प्रयत्न करणाऱ्या इमानी कुत्र्यास देखील जीव गमवावा लागला आहे.