बेळगाव शहर आणि परिसरात सतत पावसाचा मारा सुरू आहे. पावसाने निर्माण झालेल्या गारव्यामुळे लहान मुले आणि वयोवृद्ध नागरिक आजारी पडत आहेत. व्हायरल तापाची आणि खोकल्याचीही साथ आली असून दवाखान्यात गर्दी वाढत आहे.
पाऊस थोडी सुद्धा उसंत न घेता कायम कोसळत असल्याने आजारात वाढ झाली आहे. खोकल्याने नागरिक संत्रस्थ होत आहेत. याचबरोबर लहान मुले आजारी पडण्यात वाढ झाली आहे.
रात्रीच्या वेळीही पाऊस कोसळत असून शेतीच्या दृष्टीने आता पावसाने थोडी उसंत घ्यावी अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे. पाऊस नव्हता तेंव्हा ये रे ये रे पावसा म्हणणाऱ्या लोकांना आता थोडे दिवस जा रे जा रे पावसा म्हणावे लागत आहे.
पाऊस हा गरजेचा आहे. तो पडला नाही तर नदी नाले आटून पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होते आणि कोरडा दुष्काळ येतो. यंदा बेळगाव सह काही तालुक्यात प्रशासनाने कोरडा दुष्काळ जाहीर केला होता. पण आता प्रशासनाला ओला दुष्काळ जाहीर करावा लागणार की काय? अशी वेळ आली आहे.