पावसाने आता हाहाकार माजवण्यास सुरुवात केली आहे. घरा घरात ड्रेनेज आणि पावसाचे पाणी शिरून समस्या होत आहेत. पिरनवाडी , ओमनगर खासबाग, मराठा कॉलनी व कामत गल्ली येथील अनेक कुटुंबे पाणी घरात शिरल्याने त्रासात आहेत.
बेळगाव शहरातील मध्य भाग असलेल्या कामत गल्लीत असेच एक कुटुंब आहे ज्या घरात पावसाचे पाणी घुसून त्यांना त्रास होत आहे त्यांना समाजाकडून मदत मिळण्याची गरज आहे.
सुशीला भूजंग बडमंजी ( वय 90) आणि चार जणांचे कुटुंब. एक खोलीत ते सगळे कामत गल्ली येथे राहतात. त्यांच्या त्या खोलीत पाणी शिरल्याने अनेक वस्तू पाण्यात बुडाल्या आहेत. हे कुटुंब त्रासात असून त्यांना आर्थिक व वास्तुरूपात मदत देण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे यावे लागेल.मागील तीन दिवसांपासून कायम हे ड्रेनेज चे पाणी या घरात शिरत आहे. पण अजून कुणीही मदत करण्यास पुढे आलेले नाही.
बेळगाव महापालिकेचे आपत्कालीन मदत पथक तर इथे पोचलेच नाही पण महा पालिका किंवा प्रशासनाने या कुटुंबाची मदत करण्याची गरज आहे या शिवाय सामाजिक संस्थांनीही आपापल्या भागातील पूर ग्रस्त कुटुंबाना लहान लहान मदत द्यायला पुढे यावे लागेल.