अति पावसाने घर हिरावून नेले आणि यातून निर्माण झालेल्या ताणातुन घरचा करता पुरुषही हिरावून नेला. अश्या परिस्थितीत जीवन जगत असलेल्या हट्टीहोळी गल्ली शहापूर येथील कुटुंबाला मदतीसाठी युवा समितीने पुढाकार घेतला आहे. या कटुंबाचा आधारवढं हरपला असून अजूनही त्यांना मदतीची गरज आहे.
गेल्या सात आगष्ट रोजी घर कोसळलं आणि मागील चार दिवसा पूर्वी त्या घराचे कर्ते पुरुष अनिल परशराम लाड( वय 52)रा. हट्टीहोळ गल्ली ,शहापूर यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले होते त्यामुळे लाड कुटुंबीय बेघर झाले आहे आणि अजूनही मानसिक धक्क्यातून सावरले नाही.
घर पडल्यामुळे तात्पुरती राहण्याची सोय झाली होती आज बुधवारी युवा समितीने या कुटुंबाला गरजू साहित्य दिले .आधारवढं हरपलेल्या या कुटुंबाला केवळ एक महिन्याचे सामुग्री देऊन उपयोग होणार नसून कायम स्वरूपी निवाऱ्याची सोयीसाठी मदत देखील करावी लागणार आहे त्यामुळे सामाजिक सेवा संघटनांनी पुढाकार घेऊन या कुटुंबाला मदत करावी अशी मागणी होत आहे.