बेळगाव शहराची जवळपास 30 टक्के जमीन कॅटोंमेंटने व्यापली आहे या भागात हिरवळ आहे या झाडे हिरवळी मुळेच बेळगाव शहराला वेगळे सौन्दर्य आहे.आता पर्यंत या कॅटोंमेंट मधली हिरवळ जपण्याचे काम मिलिटरी प्रशासन व कॅटोंमेंट बोर्ड करत आले आहे त्यात भर पडली आहे कॅम्प भागातील अनेक पर्यावरण प्रेमींची..कॅटोंमेंटचे उपाध्यक्ष साजिद शेख यांनी जवळपास दोनशे झाडे लावत ही ग्रीनरी राखण्याची परंपरा पुढे नेली आहे.
शनिवारी कॅम्प भागातील धोबी घाट हॉकी स्टेडियम सभोवताली आणि नवीन रस्त्याच्या दोन्ही बाजूला दोनशे झाडे लावत वन महोत्सव साजरा करण्यात आलाय.अशोक आयर्नचे मालक जयंत हुंबरवाडी यांनी झाडं लावत वृक्षारोपण करण्यास सुरुवात केली.
धोबी घाट स्टेडियम आणि नवीन रस्त्यावर लावण्यात आलेल्या या झाडांची देखभाल करण्यासाठी अशोक आयर्नचे मालक जयंत हुंबरवाडी यांनी देखील पुढाकार घेत दोनशे ट्री गार्ड दिले त्यामुळे या झाडांचे रक्षण होणार आहे.अनेक फळं आणि जंगली झाडे वन खात्याच्या मदतीने लावली आहेत त्यांना जतन करत कॅम्प भागाचे वैभव कायम ठेवले जाईल अशी माहिती साजिद शेख यांनी दिली.वन खात्याचे रमेश यांच्या मदतीने झाडे मिळाली शेख यांच्या कार्यालयाचे कर्मचारी वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम करत झाडे लावली असेही ते म्हणाले.
यावेळी डॉ राहिला शेख,किरण निपाणीकर, कॅटोंमेंटचे सतीश मनूरकर, प्रकाश तेलकर, डॉ गौस,श्री काळे,अरबाज शेख वन अधिकारी डुंबरगी आदी यावेळी उपस्थित होते.