शाळेला जाण्यासाठी त्यांना करावा लागतो 24 किमीचा धोकादायक प्रवास ही बातमी कर्नाटक लोकायुक्त अधिकारी न्यायमूर्ती पी विश्वनाथ शेट्टी यांनी गंभीरपणे घेतली आहे. त्यांना शाळेला जाण्यासाठी वाहतूक सुविधा पूरवा अशी सूचना लोकयुक्तांनी केली आहे.
26 जुलै रोजी त्यांनी आदेश काढला असून त्या मुलांना शाळेला जाण्यासाठी आवश्यक सोय पुरवा अशी सूचना शेट्टी यांनी केली आहे.
घनदाट अरण्यातून जाणाऱ्या या विद्यार्थ्यांची परिस्थिती माध्यमांनी उघडकीस आणली. नामवंत इंग्रजी दैनिक इंडियन एक्सप्रेस सोबत बेळगाव live ने ही बातमी प्रसिद्ध केली होती.काहीवेळा वन विभागाचे अधिकारी आपल्या वाहनातून या विद्यार्थ्यांना शाळेला सोडत असल्याचेही या बातमीत होते.
यावर न्यायमूर्ती शेट्टी यांनी गांभीर्याने दखल घेऊन हा प्रकार प्रशासकीय गलथानपणा असल्याचे म्हटले आहे. इतका लांब प्रवास करून शाळेला जाणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होऊ नव्हे याची काळजी घ्या असेही त्यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.
ही आहे live ने प्रसिद्ध केलेली जुनी बातमी