बेळगावात उदभवलेल्या भीषण पुराचा सामना करण्यासाठी एकीकडे खालून आर्मीची मदत मिळत असताना दुसरीकडे वरून एअर फोर्सने देखील राहत बचाव कार्यात सहभाग घेतला आहे.पुराच्या आस्मानी संकटाला तोंड देत भारतीय सैन्य दलाच्या मराठा इंफंट्रीच्या जवानांनी अनेकांचे जीव वाचवले आहेत त्याचाच कित्ता गिरवत वायुसेना आणि नेव्हीच्या हेलिकॉप्टरने देखील मदत कार्य सुरू केले आहे.
बेळगाव जिल्ह्यात आलेल्या पुरग्रस्तांच्या मदतीसाठी इंडियन एअर फोर्सची दोन एम आय 17 बनावटीची आणि नेव्हीचे हे अत्याधुनिक एक साधे अशी एकूण चार हेलिकॉप्टर कार्यरत असून त्यांनी गुरुवारी पासून राहत आणि बचाव कार्य सुरू केलेलं आहे. बेळगावातील सांबरा एअर फोर्स स्टेशन एअर कमांडर आर रविशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली राहत बचाव मोहीम सुरू आहे दोन दिवसात तब्बल 107 जणांना वाचवण्यात यश आले आहे.
बेळगावातील सांबरा विमान तळावरून ही हेलिकॉप्टर उड्डाण घेत असून त्यांनी अनेकांचे जीव वाचवत सुरक्षितस्थळी पोचवले आहे या शिवाय मदत म्हणून अडकलेल्या 2000 जेवणाची पाकीट पिण्याचे पाणी देखील पोचवली आहेत.बेळगाव बागलकोट जिल्ह्यातील रॉगी छनाळ उदगट्टी हल्लोळी होलेदगट्टी जिरदाळ गावात बचाव कार्य राबवले आहे.
हेलिकॉप्टरने गुरुवारी सुरू केलेल्या पहिल्या मोहिमेत गोकाक तालुक्यातील उदगट्टी येथे सात जणांना वाचवत सुरक्षित स्थळी पोचवले तर 320 जेवणाची पाकीट टाकली या शिवाय रामदुर्ग तालुक्यातील हल्लोळी येथील 17 जणांना वाचवत सुरक्षित स्थळी पोचवले.बेळगाव जिल्ह्या व्यतिरिक्त मुधोळ मधील गिरीधळ मधील एकास तर रॉगी गावातील सहा जवान वाचवले आहे.एकूण दोन दिवसात 107 जणांना सुरक्षित स्थळी पोचवले.शनिवारी देखील वासयुसेनेची मोहीम सुरू असणार आहे.
शुक्रवारी पुन्हा राहत बचाव कार्य सुरू करत रामदुर्ग मधील हल्लोळी मधून तीन तर मुधोळ मधील रॉगी मधील सहा जणांना वाचवले आहे. बचाव केलेल्या पुरग्रस्तांवर बेळगाव विमान तळावर प्राथमिक उपचार करून बचाव कॅम्प मध्ये पाठवण्यात आले आहे.