बेळगाव शहरात मीटरप्रमाणे रिक्षा चे भाडे स्वीकारण्याच्या निर्णयाला 15 ऑगस्ट पासून सुरुवात झाली आहे .प्रशासनाने सर्व रिक्षाचालकांना 15 ऑगस्टपासून मीटरप्रमाणे भाडे घ्या अशी सूचना केली आहे मात्र अद्याप मीटरप्रमाणे भाडे आकारणी सुरू झाली नाही. नागरिकांनी याला प्रतिसाद अद्याप सुरू केलेला नाही.
कारण मीटरप्रमाणे किती दर घेतले जाणार हे निश्चित झालेले नसल्यामुळे प्रशासनाने पहिल्यांदा स्टेज प्रमाणे दर निश्चित करून द्यावे अशी मागणी होत आहे. नागरिकांनी मीटरप्रमाणे भाडे घ्या अशी मागणी केल्याशिवाय रिक्षाचालक मीटर चालू करणार नाहीत. बेळगाव शहरातील पद्धत अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र प्रवाशांनी तक्रार केल्यास आम्ही कारवाई करू असे प्रशासनाने जाहीर केले आहे.
प्रवासी तक्रार करणार नाहीत कारण मीटरप्रमाणे भाडे किती द्यावे याची कल्पना नसल्यामुळे मीटर लावल्यास भरमसाठ भाडे होईल ही भीती प्रवाशांच्या मनात आहे. यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर दर निश्चिती करून द्यावी या दरांचे पत्रक प्रत्येक रिक्षामध्ये लावले जावे. तरच मीटरप्रमाणे भाडे करण्याची प्रक्रिया सुरू होईल अशी मागणी होत आहे.