गेल्या काही दिवसात झालेल्या आपत्तीत बचाव कार्यात महत्वाची भूमिका बजावलेल्या अग्निशमक दलाच्या जवानांना श्री शिवप्रतिष्ठान च्या धारकर्यांनी आणि दौडीत सहभागी होणाऱ्या युवतींनी राखी बांधून कृतज्ञता व्यक्त केली.
मागील आठवड्यात बेळगाव शहर आणि परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने पुरस्तिथी निर्माण झाली होती पाणी साचलेली ठिकाणाहून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोचवण्यासाठी अग्निशमन दल पूर्ण ताकतीने प्रयत्न केले होते त्यात श्री शिवप्रतिष्ठान च्या कार्यकर्त्यांनी ही या कार्यात मदत केली होती.
शिवप्रतिष्ठान च्या युवतींनी जवानांना राखी बांधली तर धारकर्यांनी पर्यावरण समतोल राखण्या साठी वृक्ष रोप देऊन कृतज्ञा व्यक्त केली.जिल्हा प्रमुख किरण गावडे यांनी दलाच्या कार्यचे कौतुक केले जवानांनी आपल्या जीवाची पर्वा न करता नागरिकाना वाचवल्याबद्दल आभार मानले.
पद्मप्रसाद हुली यांनी अग्निशमन दल हे फक्त आग विजवण्यासाठी नाही तर देशाचे राखीव दल आहे जे कोणत्या ही आपत्तीत सामोरे जाण्यासाठी तयार असतं नागरीकांनी त्यांच्या कार्याची दखल घेतली पाहिजे असे सांगितले. अग्निशमन दलाच्या तळावर झालेल्या कार्यक्रमात स्टेशन ऑफिसर वेंकटेश टाकेकर, डिस्ट्रिक्ट ऑफिसर यच. ए. शिवकुमारस्वामी आणि जवान उपस्तीत व श्री शिवप्रतिष्ठान चे जिल्हा प्रमुख किरण गावडे, तालुका प्रमुख परशुराम कोकितकर, शहर कार्यवाह विश्वनाथ पाटील, तालुका कार्यवाह कल्लाप्पा पाटील,विभाग प्रमुख किरण बडवाणाचे, प्रफुल शिरवलकर, गजानन बाडीवाले, गजानन पाटील, प्रवीण शिरवलकर, पद्मप्रसाद हुली, शिरीष भातखंडे,अमोल केसरकर, नरेश जाधव, सागर मुतगेकर, तुकाराम पिसे, अंकुश केसरकर, नेहा बाडीवाले,रेणू मोरे, शुभांगी दिवटे,लीना पाटील,वैष्णवी धामणेकर आदी उपस्थित होते