जिल्ह्यात पूर परिस्थितीमुळे अनेकांना फटका बसला असून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांबरोबरच सर्वसामान्यांनाही याचा नाहक त्रास सहन करावा लागला आहे. एक लाखाहून अधिक किंमतीची पिके वाया गेली असली तरी या पुरामध्ये 15 जणांचा मृत्यू झाला आहे.
पुरात वाहून जाऊन जिल्ह्यात पंधरा जण मृत्युमुखी पडले आहेत. यामध्ये काही जणांचे मृतदेह अजूनही सापडले नाहीत. बेळगाव तालुक्यातील तिघा जणांचा यामध्ये समावेश असून इतर तालुक्यात ही 12 जणांचा मृत्यू झाला आहे.
बेळगाव तालुक्यातील तिघा जणांचा पूरपरिस्थितीत मृत्यू झाला असून त्यामधील दोन कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत देण्यात आली आहे. बैलहोंगल तालुक्यातील दोन, सौंदत्तीतील 2, रामदुर्ग मधील दोन, गोकाक मधील 3 याचबरोबर अथणी तालुक्यातील 2, रायबाग मधील एकाचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या सार्या जणांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
बेळगाव तालुक्यातील दोघांचे मृतदेह सापडले असून अजून एकट्याचा मृतदेह सापडला नाही. याचबरोबर अथणी तालुक्यातील एकाचा मृतदेह सापडला नाही. त्यामुळे त्यांचा शोध अजूनही सुरू आहे. पूर स्थितीमुळे बेळगाव जिल्ह्यात पहिल्यांदाच पंधरा मृत्यूमुखी पडल्याची घटना उद्भवली आहे. यामुळे त्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी होत आहे.