बेळगाव मनपा निवडणुकीची तयारी सुरू.ही तयारी सुरू झाली असून लवकरच निवडणूक होईल. या बातम्या येत असल्या तरी प्रत्यक्षात मनपा निवडणुकीचे भवितव्य अधांतरीच आहे. बेळगावचे वकील आणि माजी नगरसेवक धनराज गवळी तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर कर्नाटक उच्च न्यायालय काय निर्णय देते यावरच हे भवितव्य ठरेल.
योग्य निकाल येईपर्यंत
निवडणूक वेळापत्रक जाहीर करू नका अशी सूचना मनपाला न्यायालयाने केली आहे. यामुळे तयारी केली तरी मनपाला निकालाची वाट बघावीच लागेल व निकाल लागल्यावर तो मान्य करून निवडणूक त्या नव्या तत्वानुसार घ्यावी लागेल. यामुळे तयारी आता करण्यात येत असली तरी आवश्यक बदल करण्याची तयारी सुद्धा ठेवावी लागणारच आहे.
आपण सरकार कडून आणि कॅबिनेट बैठक घेऊन वॉर्ड पुनर्रचना करू अशी तयारी कर्नाटकात नव्याने दाखल झालेल्या सरकारमधील काही आमदारांनी केली आहे. पण यासाठी सर्व कॅबिनेट ची मंजुरी आवश्यक असेल. ते सर्व जमून येण्यासाठी उशीर होणार आहे.
उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठात दोन आठवड्यानंतर सुनावणी होणार होती. पण झाली नाही. आणि निवडणूकवेळापत्रक निकाल लागल्याशिवाय जाहीर करता येत नसल्याने अडचण होणार आहे.
निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन मनपा निवडणूक विभागाने केलेली वॉर्ड रचना आणि आरक्षण पूर्ण चुकीचे आहे. ये बदलल्या शिवाय निवडणूक घेऊ नये या मागणीसाठी बेळगावचे माजी नगरसेवक कर्नाटक उच्च न्यायालयात गेले आहेत. न्यायालयाने आरक्षण मध्ये बदल
पुनर्रचनेवर काही महत्वाचे बदल सुचवावेत अशीच अपेक्षा आहे. पुनर्रचना करताना कशी वाट लावण्यात आली आहे याचे पुरावे देण्यात आले आहेत.
मंगळूर मनपाची केस
निवडणूक आयोगाने निवडणूक करायला द्या अशीच मागणी लावून धरली आहे. पण मुख्य मागणी बाजूला ठेवली तर ज्या गोष्टीला माजी नगरसेवक अन्याय असे म्हणत आहेत तो अन्याय पुढे रेटून निवडणूक घेतल्यासारखे होईल. त्यामुळे न्यायालयाने आपला स्थगितीचा निर्णय कायम ठेवला आहे.सरकारच्या भूमिकेवरही सर्व ठरणार आहे. मागील सरकारने केलेले बदल चुकीचे ठरवून नवीन सरकारने नवीन तरतुदी केल्या तरीही निवडणुकीचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
वॉर्ड जुने ठेवा आणि आरक्षण बदला असा न्यायालयीन आदेश यावा अशी याचिका करणाऱ्यांची अपेक्षा असून न्यायालयीन सुनावणी होईपर्यंत निवडणुकीचे भवितव्य अधांतरीच राहील.