आपत्तीग्रस्त गरजू कुटुंबाला एक महिन्याचे रेशन मोफत देण्यात येणार आहे.बेळगावातील डॉल्फिन ग्रुपच्या वतीने पुरग्रस्तांच्या मदतीसाठी ही योजना राबवली जाणार आहे. शहरात अनेक घरांची पडझड होऊन शेकडो जण बेघर झाले आहेत अनेकांच्या घरात नुकसान झाले आहे अश्याना मदत पुरवली जाणार आहे.
ज्या कुटुंबांना रेशनची गरजआहे त्यांनी मदत मिळवण्यासाठी तर ज्यांना या मोहिमेत सहभागी होऊन एक महिन्याचा एका कुटुंबाचा खर्च उचलायचा आहे अश्या कुटुंबांनी माजी महापौर विजय मोरे यांना संपर्क करायचा आहे.
एका दिवसात दहा दानशूर व्यक्तींनी या योजनेत सहभागी होऊन एका महिन्याचा एक कुटुंबाचा रेशन देण्याचा खर्च उचलला आहे लवकरच आम्ही पीडित कुटुंबांना रेशन देणार आहे अशी माहिती विजय मोरे यांनी बेळगाव live शी बोलताना दिली.बेळगाव येथील आपत्तीग्रस्त गरजू कुटुंबानी विजय मोरे यांना यांना मोबाईल 9844268687 यांना संपर्क करावे या शिवाय ज्यांना मदत द्यायची आहे त्यांनी ज्यांना मदत हवी आहे त्यांनी अश्या दोघांनी संपर्क करावा असे मोरे यांनी म्हटले आहे.
आता पर्यंत दहा जणांनी एकेक कुटुंबाचा महिन्याचा खर्च देण्याचे जाहीर केले आहे त्यात डॉ अमित पिंगट,डॉ विशाल कौलापूर,गोविंद वडवडगी,मल्लिकार्जुन पाटील महादेव जनांज,राजेश मल्लापुर,विनायक पाटील,राजकुमार पाखरे,सुरेश हेरीकुरी, उमेश कलघटगी,राम मल्या,संजीव हंचीनमनी प्रशांत पाटील, आदींनी खर्च देण्याचे ठरवले आहेकुणालाही एक महिन्याच्या रेशनची हवी असल्यास किंवा या प्रोजेक्टला मदत करायची असल्यास डॉल्फिन ग्रुप कुलदीप हंगीरगेकर 9448487988,उमेश कलघटगी 9448187333,विजय मोरे 9844268687 शी संपर्क करा असे आवाहन करण्यात आले आहे