उत्तर कर्नाटकात इतिहासात पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात पुरामुळे हानी झाली आहे याला राष्ट्रीय आपत्ती म्हणून जाहीर करा अशी मागणी माजी मंत्री काँग्रेस नेते डी के शिवकुमार यांनी केली आहे.
बेळगावात पूर ग्रस्तांची पहाणी केल्यावर पत्रकारांशी बोलतांना त्यांनी मागणी केली आहे.या संकटाचा सामना करण्यासाठी सगळे जण एकत्रितपणे कार्य करणे गरजेचे आहे यासाठी राज्य सरकारला आमचा पाठिंबा असेल असेही ते म्हणाले.
पुरात 40 हजार पेक्षा अधिक हानी झाली आहेअसे याअगोदर मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे त्यासाठी त्यांनीच केंद्राकडे राष्ट्रीय आपत्ती जाहीर करा अशी मागणी करावी या शिवाय नुकसान भरपाई देण्याबाबत जे नियम आहेत त्यात देखील बदल करायला हवा अशीही मागणी त्यांनी केली.
केंद्रात राज्यात या अगोदर वेगवेगळी सरकारे होतीत्यामुळे नुकसानभरपाई नियमात बदल करणे शक्य झाले नव्हते मात्र आता देशात व राज्यात एकच सरकार आहे त्यामुळे नियमात बदल बदल होऊ शकतो.पीडितांना तात्काळ दहा हजार रुपये देण्यात यावेत हजारो घरे कोसळलो आहेत याची नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली. घरे बांधण्यासाठी विशेष पॅकेजची घोषणा करावी मी आमदार निधीतून 50 लाख देतो असेही ते म्हणाले.