गेल्या अनेक दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने सगळीकडेच हाहाकार माजवला आहे. तसाच येथील बळ्ळारी नाला परिसरातही धुमाकूळ घातला आहे.
आतापर्यंत तिसऱ्या पूर परिस्थितीने शेतकऱ्यांची भातपीके नष्ट झाली. पाण्याचा निचरा होण्याचा एकच मार्ग तो म्हणजे बळ्ळारी नाला.आधी सर्व रस्त्यांची उंची कमी असल्याने पाणी रस्त्यावरुन पलिकडे जात होते.पण आता रस्तेच उंच झाल्याने बळ्ळारी नाला पूलाखालूनच पाणी जायचा एकच मार्ग. त्यात गाळ,जलपर्णी भरल्याने तोही बंद झाला आहे.
त्यामूळे नाल्याची पातळी वर आणि शेतीची पातळी खाली झाल्याने पाणी उलटे शेतीत गेल्याने भातपीकांचे अतोनात नूकसान झाले आहे.आता पाण्याच्या माऱ्याने धामणे रोड पूल खचायला सूरुवात झाली आहे.
तो केंव्हा कोसळेल सांगता येत नाही. अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अलिकडेच वडगाव भागातील शेतकऱ्यांनी पूलाच्या दोन्ही बाजूला साचलेला गाळ,जलपर्णी तीन वेळा स्वखर्चाने काढून थोडा पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था केली होती. अन्यथा येवढ्यात तो पूलच वाहून गेला असता. येवढा पाण्याचा मारा तिथे होतो.तेंव्हा प्रशासनाने संभाव्य धोका ओळखून यापूलावरुन होणारी वर्दळ थांबवून धोका टाळावा. अशी मागणी होत आहे.
अन्यथा नक्कीच काही विपरित घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिसरातील जनता ते कोसळलेले पूल व पूर परिस्थिती पहाण्यास जात आहेत हे ओळखून दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे.