रस्ता ओलांडत असताना हरिणाला भरधाव वाहनाने धडक दिल्याने जखमी हरणाचा दोन तास तडफडून उपचारा अभावी मृत्यू झाला.पुणे बंगलोर महामार्गावर राणी चन्नमा युनिव्हर्सिटी जवळ एक हरण रस्ता ओलांडत असताना वाहनाच्या धडकेने जखमी झाले.
वाहनाच्या धडकेमुळे त्याचा पाय मोडला होता आणि अन्य ठिकाणी दुखापत झाली होती.जखमी अवस्थेतील हरण बघून तेथील लोकांनी हरिणाला रस्त्याच्या बाजूला आणले.तेथे त्याचे तोंड उघडून पाणी पाजवले आणि काकती वन कार्यालयाला हरण जखमी झाल्याची माहिती कळवून त्वरित येऊन पुढील उपचाराची सोय करण्यास सांगितले.पण काकती विभागाचे कोणी वन कर्मचारी दोन तास झाले तरी आलेच नाहीत.
काकती पोलीस घटनास्थळी दाखल झाले पण वनविभागाचे कर्मचारी आलेच नाहीत.अखेर दोन तास झाल्यावर काकती वन कर्मचारी आले पण तोपर्यंत दोन तास अक्षरशः तडफडून प्राण सोडला होता.