पुरग्रस्तांचे बचाव कार्य विविध संघटना,सेना, हवाई दल,नौदल,राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक यांच्या सहकार्याने पार पडले .आता पूरग्रस्तांना त्वरित आवश्यक असणाऱ्या वस्तूंचा पुरवठा करणे आवश्यक आहे.चादर,बेडशीट,शैक्षणिक साहित्य,धान्य आणि अन्य वस्तू पूरग्रस्तांना पुरवणे आवश्यक आहे.
यासाठी जिल्हाधिकारी डॉ.एस.बी.बोमनहळ्ळी यांच्या अध्यक्षतेखाली पूरग्रस्तांना मदत करण्यात गुंतलेल्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची आणि व्यक्तींची बैठक दि.१६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दोन क्रमांकाच्या सभागृहात बोलविण्यात आली आहे असे जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
गेल्या आठवड्या पासून मदत कार्यात वाहून घेतलेल्या कॅम्प येथील मदिना रिलीफ फौंडेशनला डी सी बोमनहळळी ,पोलीस आयुक्त लोकेशकुमार, जिल्हा पं सी ई ओ राजेंद्र, आणि पालिका आयुक्त अशोक धूडगुंटी यांनी भेट देऊन पहाणी केली.
मदिना मशिदीच्या वतीने पुग्रस्तांना देण्यात येणारे मदत कार्य कौतुकास्पद आहे असे उदगार डी सी बोमनहळळी यांनी काढले.गेले आठवडा भर बेळगाव जिल्हा आणि महाराष्ट्रकडे मदत कार्य सामुग्री मोठया प्रमाणात पाठवत आहेत.जाती धर्म भाषा भेद नष्ट करत मदिना मस्जिदने जे काम चालू केलंय याला तोड नाही असे उदगार पोलीस आयुक्त लोकेशकुमार यांनी काढले