बेळगाव जिल्ह्यात आणि आसपासच्या भागात निर्माण झालेल्या पूर स्थितीच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी एस बी बोमनहळीनी बेळगाव शहरातील एनजीओ सामाजिक सेवा संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांची विशेष बैठक घेतली जिल्हा पंचायतीच्या सभागृहात बैठक घेऊन सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या मदतीचे आभार मानून या पुढील काळात आणखी मदत करण्याची सूचना केली आहे .
बेळगाव शहर आणि परिसरातील अनेक संघटनांनी तसेच कार्यकर्त्यांनी मदतीच्या कामांमध्ये हातभार लावला आहे. सदर सर्व काही जिल्हा प्रशासन करू शकत नाही त्यामुळे मानवी मदतीची नागरिकांच्या मदतीची महत्त्वाची भूमिका निभावली आहे. मात्र आणखी काही भागात अद्यापही मदत पोहोचू शकलेली नाही अशा जागांची यादी जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सामाजिक सेवा संघटनांकडे दिली असून या भागात अन्नधान्य, वस्तू जीवनावश्यक गोष्टी मदत करण्याची विनंती केली आहे. काही मदत सामाजिक संघटनांनी जिल्हा प्रशासनाकडे आणून दिली तर जिल्हा प्रशासन थेट नागरिकांकडे मदत पोहोचू शकते असे आवाहन यावेळी करण्यात आले.
सामाजिक सेवा संघटनांनी मदत करताना निर्माण होणाऱ्या अडचणींची माहिती देऊन या प्रकरणी जिल्हा प्रशासनाने मदत करण्याचे आवाहन केले .त्यावेळी तुम्हाला लागेल ती मदत देण्यास जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे मात्र अडचणीत सापडलेल्या पूरस्थितीतील लोकांना आम्ही सारे मिळून मदत करूया असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.