बेळगाव जिल्ह्यासह तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तरी बँक सोसायटी व इतर सहकारी संस्थांनी शेतकऱ्यांकडे कर्ज वसुलीचा तगादा लावू नये. 31 डिसेंबर पर्यंत कोणीही शेतकऱ्यांकडे कर्ज मागण्यास गेल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी डॉक्टर एस बी बोमनहळी यांनी दिला आहे.
नुकतेच घेण्यात आलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत त्यांनी हा इशारा दिला आहे. सध्या प्रत्येक जण अडचणीत आला असून माणुसकीच्या दृष्टीतून त्यांना सहकार्य करा, सर्वसामान्य जनतेला सुविधा उपलब्ध करून देण्याकडे सारेजण एकवटले आहेत, मात्र बँकांनी आणि सोसायट्यांनी करण्याचा तगादा लावला तर शेतकरी मानसिक परिस्थितीत येणार आहे ,त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याने आपल्याकडे तक्रार केली तर त्याची गय केली जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे
एक अधिकारी यावेळी नियमावर बोलत होता यावेळी सर्वांना कार्य करणे गरजेचे आहे त्यामध्ये या अधिकाऱ्याने यामध्ये तातडीने लक्ष देणे प्रत्येकाला आर्थिक सहकार्य करावे याचबरोबर नुकसान भरपाई म्हणून देण्यात आलेल्या धना देशांचाही लवकरात लवकर प्रत्येकाच्या खात्यावर तिथे ते पैसे जमा करावे अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत.
पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे पूरग्रस्तांना तातडीने 3800 रुपये मदत देण्यात येत आहे ही रक्कम प्रत्येकाच्या खात्यावर जमा करून सहकार्य करावे असेही सांगण्यात आले आहे यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पोलीस आयुक्त लोकेश कुमार यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते