हुक्केरी तालुक्यातील हिडकल येथील राजा लखमगौडा जलाशय तुडुंब भरला आहे.गेल्या काही दिवसात पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्यामुळे जलाशय भरला आहे.
जलाशय भरल्यामुळे सोमवारी दुपारी जलाशयाचे आठ दरवाजे उघडण्यात आले आहेत. हुक्केरी तालुक्यातील नदीकाठच्या जनतेला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
बेळगाव तालुक्यातील हुक्केरी तालुक्यातील अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.हुक्केरी पोलीस निरीक्षक शिवानंद यांनी गावकऱ्यांनी नदी काठी जाऊ नये अशी सूचना दिली आहे सुलतान पूर घोडगेरी,नेगनीहाळ गुडस आणि कोटबागी आदीं गावांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सोमवारी दुपारी हिडकल जलाशयातून 25 हजार क्यूसेक्स पाणी बाहेर सोडण्यात आले आहे. बेळगाव शहराला पाणी पुरवठा करणार पहिलं धरण राकस्कोप भरल्या नंतर केवळ आठवड्याच्या अंतरावर शहराला पाणी देणार हिडकल जलाशय देखील ओव्हर फ्लो झालं आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या मिटली आहे.