बेळगाव शहरावर कोसळलेल्या आस्मानी संकटाला सामोरे जाण्यास अनेक सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतलाच आहे या शिवाय गणेश मंडळांनी देखील मदत कार्यात स्वतःला वाहून घेतले आहे.याचाच कित्ता बेळगावातील महाद्वार रोड सांस्कृतिक मंडळाने गिरवला आहे.
आगामी 24 आगष्ट रोजी महाद्वार रोड सांस्कृतिक मंडळाच्या वतीने होणारी दही हंडी स्पर्धा रद्द करण्याची घोषणा महाद्वार रोड सांस्कृतिक मंडळाने केली आहे.या स्पर्धेतील आयोजनाचा आणि बक्षिसांचा खर्च शहरातील पूर ग्रस्तांना देण्याची घोषणा देखील करण्यात आली आहे.
बेळगाव शहरात विशेषतः शास्त्री नगर ,पाटील मळा भांदुर गल्ली हुलबते कॉलनी महाद्वार रोड भागात पूर आल्याने अनेकांना त्रास सहन करावे लागले आहेत विशेष म्हणजे दही हंडी स्पर्धा आयोजन भागाला देखील पुराने झोडपले आहे अश्या स्थितीत सामाजिक बांधीलकी म्हणून आम्ही यावर्षी स्पर्धा रद्द करत आहोत अशी माहिती महाद्वार सांस्कृतिक मंडळाचे संजय कडोलकर यांनी दिली.
या स्पर्धेला येणारा बक्षीस रक्कमांचा खर्च पुरग्रस्तांना मदत म्हणून देणार आहोत अनेक सामाजिक संघटना गणेश मंडळां प्रमाणे आम्हीही खारीचा वाटा उचलत आहोत असे देखील कडोलकर यांनी सांगितले.गणेश उत्सवा दरम्यान पुरग्रस्तांना मदत दिली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.सामाजिक कार्यकर्ते संजय कडोलकर अनेक सामाजिक उपक्रमांना वेगवेगळ्या माध्यमातून मदत करत असतात दही हंडीची स्पर्धा रद्द करून त्याची रक्कम पूर ग्रस्तांना देण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला आहे.