बेळगाव तालुक्यासह जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामाचे उद्दिष्ट गाठण्यात आले असले तरी सहकारी पतसंस्था आणि राष्ट्रीयीकृत बँकांनी शेतकऱ्यांची बोळवण केली आहे. हे कर्ज वाटपाचे नाटक आणि शेतकऱ्यांची दिशाभूल यामुळे अजूनही कर्ज वाटप करण्यात आले नसल्याची तक्रार सामोरी आली आहे. त्यामुळे पिक कर्ज वाटपाचे केवळ फार्सच असल्याचे सांगितले जाते.
यंदा जिल्ह्यात ऐंशीहून अधिक टक्के पेरणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे. मात्र यामध्ये कोणत्याही बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज दिले नाही. बँकांच्या आडमुठेपणामुळे शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना कर्ज मिळवून द्यावे, अशी मागणी आहे.
यंदाच्या खरीप हंगामात कोट्यावधी रुपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र त्यातला एक नवा पैसाही शेतकऱ्यांना कर्ज देण्यात आले नाही. कर्जमाफी नंतर नवीन कर्जास पात्र शेतकऱ्यांची संख्या वाढल्याने कर्ज देण्यास टाळाटाळ केल्याचे बँकांकडून सांगण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात कर्जत वाटायचे नाही असे ठरवल्यानंतर शेतकरी हतबल झाला आहे.
विशेषता राष्ट्रीयकृत बँका शेतकर्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहेत. केवळ मोजक्याच शेतकऱ्यांना याचा लाभ झाला असून अजूनही बरेच जण अडचणीत आहेत. शेतकऱ्यांना बँकिंग यंत्रणेमार्फत कमी व्याज दराने पीक व अन्य कर्ज उपलब्ध करून देण्याची सोय राज्य सरकारने करून दिली आहे. मात्र शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.