बुधवारी देखील खानापूरात पावसाचा हाहाकार झाला असून दिवसभर संततधार सुरुच होती. खानापूर शहरातील दुर्गानगर मारुती नगर नागलींग नगर या वसहतीना मलप्रभेच्या महापुराचा वेढा घातला आहे .प्रशासन आणि स्थानिकांनी दोनशे कुटुंबांनी खाली करून दुसरीकडे स्थलांतरित केले आहे.
बुधवार प्रमाणे जर पावसाचा जोर असाच राहिल्यास शहरात भयानक परिस्थिती निर्माण होणार आहे. विशेष म्हणजे या महापुराचा तडाखा मोठ्या प्रमाणात बसला आहे. कालच्या पेक्षा पाणि पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेल महापुराच्या पाण्याखाली गेल्याने पुढील चार दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
(Photo: खानापूर शहरातील उपनगर दुर्गांनगर चारी बाजूनी आलेला मलप्रभेचा पूर)
खानापूर शहरातील नवीन पूल पाणी कमी झाल्याने उतरला होता मात्र पावसाने पुन्हा जोर पकडल्याने नदीची पाणी पातळी वाढली असून नवीन पुलावर कालच्या प्रमाणे पाणी वाढले आहे त्यामुळे परिणामी खानापूर लोंढा वाहतूक पुन्हा ठप्प झाली आहे.
पन्नास वर्षा नंतर बेळगाव जांबोटी रोड वरील कुसमळीच्या पुलावरून मलप्रभा नदीचे पाणी ओव्हरफ्लो झाले आहे तर प्रसिद्ध हब्बनहट्टी चे मारुती मंदिर पूर्ण पाण्याखाली गेले आहे.