विविध पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पुरग्रस्तांच्या साठी विधायक सहायय करण्याचे ठरवण्यात आले.अति वृष्टीमुळे झालेल्या परिस्थिती मुळे शहरातील अनेक कुटुंबांना याचा फटका बसला आहे अश्या लोकांना वस्तू रुपात मदत देण्याचे ठरवण्यात आले.
शहरांवर कोसळल्या संकटात सगळ्यांनी भेदभाव न करता इतकं मोठं संकट असताना कोणालाही कोणतीच इजा न होता जसे सहकार्य केले आहे त्याच धर्तीवर आपत्ती ग्रस्त कुटुंबांना मदत देऊन सावरण्याची गरज व्यक्त करत माजी उपमहापौर महिला आघाडीच्या अध्यक्ष रेणू किल्लेकर यांनी वस्तू रुपात किंवा आर्थिक रुपात मदत करावी असे आवाहन केले.
या बैठकीस माजी नगरसेवक मोहन बेळगुंदकर,माजी महापौर सरिता पाटील,मराठा बँकेचेअध्यक्ष लक्ष्मण होनगेकर,मराठा मंदिराचे शिवाजी हांगीरगेकर,कॅपिटल वनचे शिवाजी हंडे,श्रीकांत देसाई,चंद्रकांत गुंडकल व उष् काल ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.इच्छुकांनी आपली मदत वस्तू किंवा आर्थिक रुपात महिला आघाडीच्या कार्यालयात जमा करावी असे आवाहन देखील करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी रेणू किल्लेकर 9448191327,सरिता पाटील 9880677762,मोहन बेळगुंदकर 9448129277,शिवाजी हंडे 934364900 यांना संपर्क करा असे आवाहन करण्यात आले आहे.