पुरात अडकलेल्या लोकांना मदत करा माझ्या मागे फिरू नका अश्या स्पष्ट सूचना मुख्यमंत्री बी एस येडीयुराप्पा यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.बुधवारी सायंकाळी ते बेळगावात दाखल झाले आहेत.
सायंकाळी त्यांनी खासबाग साई भवन येथे पूर ग्रस्तांना तयार केलेल्या आश्रय केंद्राला भेट देऊन चर्चा केली आणि समस्या जाणून घेतल्या.केवळ वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माझ्या सोबत राहावं बाकी सगळ्यांनी स्वतःला पुनर्वसन मदत कामात वाहून घ्यावे अश्या देखील सूचना त्यांनी केल्या उत्तर कर्नाटकात उदभवलेल्या पुरातुन निपटण्यास केंद्र सरकार कडून मदत मागितली जाईलअसेही ते म्हणाले.
गुरुवारी सकाळी दहा वाजता ते कपिलेश्वर कॉलनी येथे भेट देणार आहेत त्या नंतर चिकोडीला रवाना होणार आहेत.तत्पूर्वी बुधवारी सायंकाळी 6:30 वाजता विशेष विमानाने बेळगावला आले होते विमान तळावर पोलीस दलाने सलामी देऊन त्यांचे स्वागत केले.मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदा ते बेळगाव दौऱ्यावर आले आहेत उद्या गुरुवारी रस्ते मार्गे ते चिकोडी अथणी पूरग्रस्तांना भेट देऊन सायंकाळी हवाई पहाणी करणार आहेत.