मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा उद्या बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यात दाखल होतील. कर्नाटक विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते महंतेश कवटगीमठ आणि माजी मंत्री लक्ष्मण सवदी यांनी रविवारी रात्री मुख्यमंत्र्यांच्या घरी भेट दिली.
पूर स्थिती बिकट असल्याचे सांगितले. या पार्श्वभूमीवर हेलिकॉप्टरने येडीयुरप्पा अथणी येथे पोहोचतील आणि पूर परिस्थितीचे निरीक्षण करण्यासाठी सत्ती व नंदेश्वर ला उड्डाण करतील, असे कवटगीमठ यांनी सांगितले.
यापूर्वी हवामान परिस्थितीमुळे बेळगावचा जिल्हा दौरा रद्द करण्यात आला होता. पण आता रस्ते मार्गाने नाही तर हवाई मार्गाने येऊन मुख्यमंत्री पाहणी करणार आहेत.