काल दिवसभर जायंट्सने बेळगाव शहरातील प्रमुख रस्त्यावरील खड्डे चांगल्या प्रतीच्या काँक्रेटने बुजवल्यानंतर आज झोपी गेलेल्या प्रशासनाला जाग आली आहे.
बुधवारी सकाळपासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने पेव्हर्स घालून खड्डे बुजवण्याचे काम चालू झाले आहे.महानगरपालिकेच्या वतीने गणपतगल्ली, शास्त्रीनगर, एसपीएम रोड आदी भागातील खड्डे बुजवले जात आहेत. सामाजिक संघटनेने स्व खर्चातून चांगल्या दर्जाच्या काँक्रेट वापरून खड्डे बुजवल्याने मनपा आणि शासकिय यंत्रणेवर टीका झाली होती त्यानंतर सुस्त मनपा जागी झाली आहे.
मंगळवारी जायंट्स सारख्या सामाजिक संघटनेने दगडमाती किव्हा पेव्हर्स न वापरता थेट काँक्रीटीकरण केले होते या शिवाय घातलेलं सिमेंट काँक्रेट घट्ट व्हावं म्हणून संघटनेन काँक्रेटवर पाण्याचा फवारा देखील मारला होता. काल सायंकाळी बुजवलेल्या खड्ड्यात पाणी मारले.
ऐन गणेश उत्सवाच्या तोंडावर झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील रस्त्यांची वाताहत झाली आहे रस्ते चाळण बनले आहेत त्यांची डागडुजी करण्याची गरज बनली आहे.जायंट्स संस्थेने मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजवले आता शासनाने मुख्य रस्त्या व्यतिरिक्त इतर लहान गल्ली बोळातील खड्डे बुजवावेत अशी मागणी आहे.गणेश आगमन मिरवणुकीत रस्ते गुळगुळीत होण्याची गरज आहे दरवर्षी ते काम केले जाते मात्र यावर्षी उशीर झाला आहे.