Friday, January 3, 2025

/

येडीयुराप्पा आजच करणार बेळगाव शहराची पहाणी

 belgaum

मुख्यमंत्री बी एस येडीयुराप्पा हे आज म्हणजे बुधवारी सायंकाळी बेळगावात दाखल होणार असून शहर परिसरात पावसाने पुराखाली गेलेल्या भागाची पाहणी करणार आहेत.बेळगावशहरात सतत होत असलेल्या पावसामुळे मध्यवर्ती भागात उपनगरात तालुक्यात पुराची स्थिती निर्माण झाली आहे बेळगावं शहरातील भागांना ते भेटी देणार आहेत.

बंगळुरू हुन पाच वाजता ते विमानाने सांबरा येथे दाखल होणार असून त्या सात वाजता शहरातील पूर आलेल्या भागाची पाहणी करणार आहेत या नंतर जिल्हाद डॉ एस बी बोमनहळळी यांच्याशी चर्चा करून पुरा बद्दल माहिती घेणार आहेत.

बुधवारी ते बेळगावातील शासकीय विश्रामगृहात वास्तव्यास असणार असून गुरुवारी सकाळी 8 वाजता जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.पुराने बेळगाव आणि बागळकोट मध्ये झालेल्या हानीचे ते रस्ता मार्गे पहाणी करणार आहेत.

गुरुवारी सायंकाळी हवामान योग्य असल्यास बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी अथणी सह खानापूर बेळगाव हवाई पहाणी करणार आहेत.त्यानंतर सायंकाळी सात वाजता विमान मार्गे बंगळुरू ला रवाना होणार आहेत.मुख्यमंत्री बी एस येडीयुरापा यांचे विशेष अधिकारी व्ही पी चननबसवेशा यांनी या दौऱ्याचे पत्रक दिले आहे.

मुख्यमंत्री बी एस येडीयुरापा या ठिकाणी बेळगाव शहरात भेट देणार आहेत.

सांबरा..सर्किट हाऊस
जुने भाजी मार्केट
जुना पी बी रोड
पटसन शो रूम
धामणे रोड
शिवाजी उद्यान बँक ऑफ इंडिया
नाथ पै सर्कल
गोवावेस
पहिला रेल्वे गेट
काँग्रेस रोड
रेल्वे स्टेशन
पाटील गल्ली
वीरभद्र नगर शिवाजीनगर पुन्हा सर्किट हाऊस ..

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.