बेळगाव शहराचा समावेश स्मार्ट सिटीत झाला असून सध्या या स्मार्ट सिटीच्या कामाने नागरिक हैराण झाले आहेत. स्मार्ट सिटी अंतर्गत येणाऱ्या कामांमध्ये योग्य ते नियोजन नसल्यामुळे अनेक ठिकाणी खड्डे काढून ते तसेच टाकून देण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक अपघात घडत आहेत. सध्या अशोक नगर येथे अशाच प्रकारची घटना घडली आहे
अशोक नगर येथे रस्ता करण्यासाठी व गटारे निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खड्डे खोदण्यात आले आहेत. मात्र ते खड्डे योग्य रीतीने बुजविले नसल्यामुळे अनेक अपघात घडत आहेत. रविवारीही अशीच घटना घडली आहे. अशोकनगर येथे एक डिजायर कार कलंडली असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
संततधार पाऊस असल्यामुळे कार चालक सावकाश चालला होता. मात्र रस्त्याशेजारी खोदण्यात आलेल्या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने कारचालक खड्ड्यात कोसळला. ही कार पलटी झाली असून यामध्ये कोणतीच हानी झाली नाही. मात्र कारचे नुकसान झाले आहे.
हे प्रकार वारंवार घडत असून अशोकनगर परिसरात खोदण्यात आलेले खड्डे तातडीने बुजवावेत अशी मागणी होत असतानाच महानगरपालिकेने केलेल्या कुचकामी कामाचे प्रदर्शन सध्या दिसून येत आहे. बेळगाव शहराचा स्मार्ट सिटीत समावेश झाला असला तरी अजूनही शहर कधीच स्मार्ट होणार नाही का? असा सवाल निर्माण होत आहे. निर्माण करण्यात आलेले खड्डे तातडीने बुजवावेत अशी मागणी होत आहे.