मंगळवारी संतीबस्तवाड येथील नाल्यात मंगळवारी सायंकाळी वाहून गेलेल्या कारचा शोध लागला असून कारमध्ये एक मृतदेह सापडला आहे.हा मृतदेह गोव्यातील व्यक्तीचा असल्याचे त्याच्या कागदपत्रांवरून समजले आहे. जयचंद्र गुंडापनेनी असे त्या व्यक्तीचे नाव असून तो कॉन्ट्रॅक्टर होता. विजयवाडा हुन गोव्याला जात असताना ही दुर्घटना घडली आहे.बेळगावातील पुराचा हा पहिला बळी ठरला आहे.
बेळगाव live ने वृत्तांकनातं व्ही टी यु नाल्यात कार वाहून गेली अशी बातमी केली होती काही प्रत्यक्ष दर्शीनी कार वाहून जायची बघून पोलिसांना कळवलं होत त्यानुसार पोलिसांनी तपास देखील चालवला होता.
मंगळवारी सायंकाळी त्या रस्त्यावरून अडीच फूट पाणी वाहत होते.कारचालकला पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज आला नाही त्यामुळे कार तशीच पुढे नेली पण पाण्याचा प्रवाह जोरदार असल्यामुळे कार वाहून गेली आणि कार चालकाला स्वतःची सुटका करून घ्यायला देखील वेळ मिळाला नाही.
शनिवारी दुपारी ग्रामीण पोलीस आणि स्वयंसेवी संघटनांनी मिळून अथक प्रयत्न करून क्रेनद्वारे ही कार बाहेर काढली.