सध्याच्या पूरपरिस्थितीत अनेकांचे हाल होत आहेत. अशाच अनेक निराधार निराश्रीत यांचा आधार होण्याची खरी गरज आहे. ती गरज ओळखून आमदार अनिल बेनके यांनी काम सुरू केले आहे. रस्त्यात पडलेले खाऊन स्वतःचे जीवन जगणाऱ्या एका निराश्रित व्यक्तीला आज आमदारांनी आधार दिला.
काही सामाजिक सेवा संघटनांच्या मदतीने त्याला मच्छे येथील निराश्रित आश्रम मध्ये भरती करण्यात आले आहे. याप्रकरणी आमदारांचे कौतुक होत आहे .
संबंधित व्यक्ती रस्त्यावर पडलेले खाऊन जगत असल्याचे लक्षात आल्यानंतर आमदारांनी स्वतः भेट देऊन पाहणी केली. त्यांच्या बरोबरीने सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा केकरे, लोकेश राजपूत, संतोष दरेकर, डॉक्टर आणि निराश्रित केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.
या साऱ्यांनी मिळून त्या व्यक्तीची निराश्रित केंद्रात रवानगी केली आहेत .
केंद्रामध्ये त्याच्या पोटापाण्याची व औषधोपचाराची व्यवस्था केली जाणार असून त्यानंतर तो नेमका कुठला आहे याचा शोध घेऊन त्याच्या घरी त्याला पाठवण्यात येईल .अशी माहिती आमदार अनिल बेनके यांनी दिली आहे