देशातील पाच ठिकाणी महिला मिलिटरी पोलीस भारतीं प्रक्रिया राबविली जाणार आहे त्यात अंतर्गत बेळगावातील मराठा रिजेमेंट मध्ये पहिल्या महिला मिलिटरी पोलीस भर्तीचे आयोजन करण्यात आले होते . गेल्या चार दिवसात बेळगावात कर्नाटक आंध्रप्रदेश तामिळनाडू तेलंगणा ,लक्षदीप पाँडिचेरी या दक्षिण भारतातील मुलींनी सहभाग दर्शवला होता . देशात पहिल्याच वेळी महिला पोलीस मिलिटरी भरती होत असल्याने याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे .
रविवार हा शारीरिक चाचणीचा शेवटचा दिवस होता त्यावेळी आर्मी रिकरुटमेन्ट अधिकाऱ्यांनी पत्रकारांना याबाबची माहिती दिली . तीन हजार पैकी एक हजार मुलीनी घेतला शारीरिक चाचणीत सहभाग घेतला होता.त्यातील अंदाजे दोनशे मुली लिखित परीक्षेसाठी निवडल्या जातील. ऑक्टोबर महिन्यात महिला मिलिटरी स्पर्धेची लिखित परीक्षा होईल.बेळगावातील पहिल्या महिला मिलिटरी भर्तीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अशी माहिती आर्मी रिक्रुटमेंटचे ब्रिगेडिअर दिपेंद्र रावत यांनी दिली.
भारती लष्करामध्ये पोलीस भरतीची प्रक्रिया पहिल्यांदाच पार पडली. मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या बेळगाव केंद्रात एक ते पाच ऑगस्ट दरम्यान ही प्रक्रिया झाली. मुख्यालय निवृत्ती विभाग बेंगलोरच्या अखत्यारीत सहाय्यक नेमणूक अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली ही भरती प्रक्रिया झाली आहे. लष्करी इतिहासातील पहिल्यांदा अशी भरती आहे.
तामिळनाडू केरळ आंध्र प्रदेश तेलंगणा आणि कर्नाटक तसेच अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप पांडिचेरी साठी ही भरती झाली एकूण पंधरा हजार महिलांनी यासाठी अर्ज केला होता त्यापैकी चाचणी घेण्यात आली असून शारीरिक चाचणी मध्ये एक हजार महिला निवडल्या गेल्या आहेत. आता त्यांची ऑक्टोबरमध्ये लेखी परीक्षा होणार असून त्यानंतर त्यांची भरती होणार आहे.एकूण 100 पात्र महिला उमेदवारांना निवडले जाणार असून बेळगाव परिसरातील 20 ते 25 उमेदवारांना संधी मिळू शकते.
या महिला मिलिटरी पोलीस भरतीत देशभरातून १०० जागांसाठी असल्याने फार मोठ्या प्रमाणात अर्ज आले होते देशभरात पाच ठिकाणी भरती प्रक्रिया चालणार असून दक्षिण भारतासाठी बेळगावात भरती झाली आहे अन्य चार ठिकाणी इतर राज्यासाठी हि प्रक्रिया असणार आहे देशभरात एकूण १०० जागा करीत अडीच लाख मुलींनी अर्ज केले आहेत . बेळगावात १५ हजार मुलींनी ऑनलाईन अर्ज भरले होते त्यापैकी ३ हजार मुलींना शारीरिक चाचणी बोलावण्यात आले होते तीन हजार पैकी एक हजार मुलींनी यात सहभाग घेतला आहे अशी माहिती मिलिटरी अधिकाऱ्यांनी दिली .