तालुक्यात मोठ्या प्रमाणात पुराचा फटका बसला आहे. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. मात्र ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांना मदत मिळवून देण्यासाठी अधिकाऱ्यांनी कानाडोळा केला आहे. कोणत्याही तालुका पंचायत सदस्यांना विचारात न घेता धनादेश वाटण्यात आले आहेत. यामुळे अनेक सदस्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
तालुका पंचायत कार्यालयात झालेल्या सर्वसाधारण सभेत अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक उडाली. यावेळी तालुका पंचायत अध्यक्ष शंकरगौडा पाटील अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी तालुका पंचायत उपाध्यक्ष मारुती सनदी, कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कालादगी व्यासपीठावर होते.
यावेळी अधिकाऱ्यांनी ग्राम पंचायत, तालुका पंचायत, आणि जिल्हा पंचायत सदस्यांना घेऊन धनादेश वाटले असते तर ही समश्या राजकारण झाले नसते. मात्र संबंधित अधिकारी यांनी कोणाला ही विचारत न घेता मनमानी कारभार केल्यामुळे अनेकांना याचा त्रास झाला आहे.
मागील काही माहिन्यापासून तालुका पंचायत सदस्य आणि पीडिओ यांची बैठक घेण्यात आली नाही. वारंवार सांगून ही बैठक का घेण्यात आली आणि, अधिकारी तालुका पंचायत सदस्य चे ऐकत नाहीत तर काय उपयोग? असा सवाल उपस्थित करण्यात आला. यावेळी उदय सिद्धांणार, सुनील अष्टेकर, नारायण नलवडे, रावजी पाटील, वसंत सुतार, काशिनाथ धर्मोजी आदी उपस्थित होते.