तालुक्यात 2005 नंतर पहिल्यांदाच 2019 मध्ये असा महाभयानक महापूर आला आहे या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सारेजण सज्ज झाले असले तरी जिल्हाधिकाऱ्यांनी मात्र याकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने तालुक्याचा दौरा करावा आणि ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने करण्यात आले आहे
जळगाव तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शेतीबरोबरच अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत अशा परिस्थितीत संबंधित अधिकाऱ्यांनी ाहणीचे केवळ नाटक केले आहे त्यामुळे जिल्हाधिकार्यांनी स्वतः तालुक्याचा दौरा करून नुकसानग्रस्त नागरिकांना मदत करावी असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे
तालुक्यातील काकती कडोली होनगा उचगाव आदी भागात मार्कंडेय नदीपात्रातील पाणी बाहेर पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे ही परिस्थिती काही प्रमाणात सुधारली असली तरी अजूनही अनेकांची घरे चिखलाने माखले आहेत उत्तर काही घरांच्या भिंती पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अशा परिस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांनी तालुक्याचा दौरा करून संबंधितांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे
या पूरपरिस्थितीत काही जनावरे दगावली आहेत मात्र त्यांना अजूनही नुकसानभरपाई मिळत नाही त्यांची रोजीरोटी या जनावरावर होती त्यांनीच याकडे पाठ फिरवल्याचे दिसून येतंय मात्र ज्यांची जनावरे व घरांचे नुकसान झाले आहे अशा लोकांना तातडीने मदत करून शुद्ध पाणीपुरवठा करावा अशी मागणीदेखील करण्यात आली आहे यावेळी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष मातृ गुरुचे तालुका पंचायत सदस्य सुनील अष्टेकर सरचिटणीस मनोज पावशे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते