Thursday, January 23, 2025

/

शेतकऱ्यांना जारकीहोळी यांचा धीर

 belgaum

तुमचे कष्ट दूर करण्यासाठी मी आहे.कोणत्याही परिस्थितीत धीर सोडू नका.तुमची समस्या कितीही मोठी असुदे, नुकसान कितीही मोठे असुदे मी तुम्हाला मदत करतो असे आश्वासन यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी यांनी दिले आहे.

सोमवारी पूर ग्रस्त भागाची पाहणी केल्यावर त्यांनी हुदली,मुचंडी गावच्या जनतेला वरील आश्वासन दिले.बेळगाव तालुक्यातील पूर्व भागात बळळारी नाल्यामुळे पूर आला आहे त्याची पहाणी सतीश जारकीहोळी यांनी केली.

Satish jarkiholi visited flood affected area

पावसामुळे शेतीचे ,घरांचे नुकसान झाले आहे.नुकसान झालेल्यांना सरकारकडून नक्की मदत मिळवून देतो. पुढील वर्षी पावसाळ्या अगोदरच नुकसान होऊ नये म्हणून उपाययोजना करण्यात येईलअसेही जारकीहोळी यांनी सांगितले.

पाच तासहून अधिक काळ जारकीहोळी यांनी पाहणी केली.त्यांच्या समवेत जिल्हा पंचायत,तालुका पंचायत आणि ग्राम पंचायत सदस्य उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.