यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शहर आणि परिसरातील अनेक रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून त्यामुळे अनेक अपघात घडत आहेत त्यामुळे अनेकजण जखमी होत आहेत हे टाळण्यासाठी जायंट्स मेन या सेवाभावी संघटनेच्या वतीने प्रमुख रस्त्यावरील संपूर्ण खड्डे काँक्रीट घालून मुजवण्यात येणार असून शहरातील या खड्यांचे आज सर्वेक्षण करण्यात आले.
आज संध्याकाळी स्पे कमिटी सदस्य मोहन कारेकर, फेडरेशन संचालक मदन बामणे, जायंट्सचे संचालक सुनिल चौगुले, खजिनदार लक्ष्मण शिंदे आणि सुनिल मुरकुटे यांनी खड्यांचे मोजमाप केले.मंगळवारी सकाळी नऊ वाजता के एल ई हॉस्पिटल रस्त्यावरून या अभिनव कार्याची सुरुवात होणार आहे.
गणपती उत्सव तोंडावर असताना शहरातील रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे याचा त्रास ये जा करणाऱ्या दुचाकी स्वारांना होत आहे एकीकडे मनपा यंत्रणेने शहरातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांकडे दुर्लक्ष केले असताना सामाजिक संघटना खड्डे बुझवण्यासाठी पुढाकार घेत आहेत.
वास्तविक पाहता गणेश आगमना अगोदर खड्डे बुझवण्याची गरज आहे मात्र मनपा यंत्रणा कुठेच दिसत नाही त्यामुळेच सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला आहे. सामाजिक संघटना सरसावलेल्या पाहून सुस्त मनपा यंत्रणा जागी होईल का? हा गणेश भक्तांचा दुचाकी चालकांचा सवाल आहे.
कुठेही खड्डे असतील तर 9448191266 वर संपर्क करावा.खड्डा दाखवा खड्डा मुजवा या संकल्पने अनुसार हे कार्य हाती घेतले जाणार आहे असे आवाहन करण्यात आले आहे.